महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

 महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सध्या अहमदनगर जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १७४१३ चौ.किमी. एवढे आहे.
     त्यानंतर पुणे (१५६४२ चौ.किमी.) व नाशिक (१५५३० चौ.किमी.) या जिल्ह्यांचा क्रमांक येतो.

       तरी या तीन जिल्ह्यांनंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांचा विचार केला तर पुढील जिल्हे येतील :
  
  • ४. सोलापूर (१४८४५ चौ.किमी.)

  • ५. गडचिरोली (१४४१२ चौ.किमी.)

  • ६. यवतमाळ (१३५८४ चौ.किमी.)

  • ७. अमरावती (१२६२६ चौ.किमी.)

  • ८. जळगाव (११७६५ चौ.किमी.)

  • ९. चंद्रपूर (१०६९५ चौ.किमी.)

  • १०. सातारा (१०४८४ चौ.किमी.)

            खूप कमी जणांना माहीत असेल की महाराष्ट्र राज्य तयार झाल्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा चंद्रपूर जिल्हा होता ज्याचे क्षेत्रफळ सुमारे २५१०७ चौ.किमी. एवढे होते. १९८२ मध्ये गडचिरोली जिल्हा चंद्रपूरपासून वेगळा करण्यात आला व त्यानंतर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा बनला.

          १९८१ मध्ये जालना जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यामधून वेगळा करण्यात आला व त्याच्या आधीपर्यंत औरंगाबाद जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावरचा जिल्हा होता ज्यांचे पूर्ण क्षेत्रफळ १७७१२ चौ.किमी. एवढे होते.


टिप्पण्या